MB NEWS:पंकजा मुंडे वैद्यनाथ मंदिरात:सेल्फी घेण्यासाठी महिला भाविक युवक, युवतींची झुंबड

 पंकजा मुंडे  वैद्यनाथ मंदिरात:सेल्फी घेण्यासाठी महिला भाविक युवक, युवतींची झुंबड



परळी वैजनाथ ।दिनांक १८।  

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. 


   प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्री निमित्त राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  आज सकाळीच पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले. शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेवरील संकट दूर करून सर्वांच्या सुखाची  प्रार्थना त्यांनी यावेळी केली. वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. 


*सेल्फी घेण्यासाठी महिला भाविक युवक, युवतींची झुंबड*

------------

पंकजाताई मुंडे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात जमा झालेल्या महिला, युवक, युवती व सर्व सामान्य नागरिकांनी त्यांचेसोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांना एकच गराडा घातला. सेल्फीसाठी प्रत्येकांची झुंबड उडाली होती, पंकजाताईंनी देखील यासाठी सर्वांना आवर्जून मनसोक्त वेळ देत सर्वांची इच्छा पूर्ण केली तसेच भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार