MB NEWS:होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांची धडक कारवाई 32 जणांचे वॉरंट तामिल

 होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांची धडक कारवाई 32 जणांचे वॉरंट तामिल



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.  

        होळी सण व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांवर दोषारोपपत्र व  अटक वॉरंट बजावलेले आहे अशा आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या वॉरंटची तामिली करण्याची धडक मोहीम संभाजीनगर पोलिसांनी राबवली. आज दिनांक सहा रोजी दिवसभरात संभाजीनगर पोलिसांनी 32 वॉरंटची तामिली केली आहे.


      याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने वॉरंट असलेल्या लोकांचा पहाटेपासूनच शोध घेण्याची मोहीम राबवली. 32 जणांच्या वॉरंटची प्रत्यक्षात तामिलीही केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संभाजीनगर पोलिसांनी बेधडक मोहिमेचे ही कारवाई केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार