इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:मोठी घरफोडी: एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडली

 मोठी घरफोडी: एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडली



गेवराई....

गेवराई तालुक्यात घरफोडीचे प्रमाण वाढले असून काल मध्येरात्री अज्ञात चोरट्यांनी सावरगाव येथे धुमाकूळ घालत एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडले. चारही घरातून सोन्याचांदीसह रोख असा दोन लाखाचा मुद्देमार चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने सावरगाव सह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संदिप वसंत वाघमारे, पांढुरंग कान्होबा मिसाळ, शरद नारायण लोंड, व लक्ष्मण लहूजी मिसाळ यांचे सावरगावमध्ये एकाच गल्लीत घरे आहेत. अज्ञात चोरट्यांनी 22 मार्च रात्री 1 ते 5 च्या दरम्यान बंद घरे फोडून घरातील रोख रक्कम लंपास केली. त्यामध्ये रोख एक लाख 54 हजार रुपये, 7 ग्रॉमचे झुंबर, 4 ग्रॉमची ठुसी, 9 ग्रॉमची अंगठी, 2 ग्रॉमचा बदाम, 2 ग्रॉमची नथ यासह पांडूरंग मिसाळ, लहुजी मिसाळ, शदर लांडे यांच्याही घरातून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम लंपास झाली आहे. या प्रकरणी संदिप वसंत वाघमारे यांच्या फिर्यादीवरु गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या