इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:नाथ प्रतिष्ठानचा उपक्रम

 पाडव्याला धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून नमामी वैद्यनाथम या विशेष संगीत शिवपूजनाचे आयोजन

*हर हर शंभू फेम अभिलिप्सा पांडा, आर्या आंबेकर, बेला शेंडे, स्वप्नील गोडबोले, प्रतीक सोळसे यांच्या उपस्थितीत रंगणार शिवस्तुती व चित्तथरारक शिवतांडव!*


*नाथ प्रतिष्ठानचा उपक्रम*


मुंबई (दि. 20) - गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रथमच परळी वैद्यनाथ येथे आ. धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत नमामी वैद्यनाथम या खास संगीतमय शिवपूजनाचे आयोजन केले आहे. हर हर शंभू या देशभरात लोकप्रिय ठरलेल्या गीताच्या गायिका अभिलिप्सा पांडा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 


गुढी पाडव्याच्या दिवशी (बुधवारी) नाथ प्रतिष्ठाण च्या वतीने नमामी वैद्यनाथम या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे वैद्यनाथ मंदिर परिसरातील पार्किंग प्रांगणात या कार्यक्रमाचे आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. आग्रा येथील क्रेझी हुपर्स ग्रुप सादरीत चित्तथरारक शिवतांडव देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे. 


या कार्यक्रमात शिवस्तुती, शिवभजन, व चित्तथरारक शिवतांडव सादर करण्यात येणार असून यासाठी हर हर शंभू फेम अभिलिप्सा पांडा, प्रसिद्ध गायिका बेला शेंडे, आर्या आंबेकर, गायक व संगीतकार स्वप्नील गोडबोले, इंडियन आयडॉल फेम प्रतीक सोळशे तसेच क्रेझी हुपर डान्स ग्रुप आग्रा हे कलाकार प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. 


परळीमध्ये प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमाचा परळी वैद्यनाथ व परिसरातील सर्व शिव भक्तानी लाभ घ्यावा, असे आवाहन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने वाल्मिक अण्णा कराड यांनी करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!