MB NEWS:पञकार महादेव गित्ते यांना पितृशोक; फुलचंद गित्ते यांचे दुःखद निधन

 पञकार महादेव गित्ते यांना पितृशोक; फुलचंद  गित्ते यांचे दुःखद निधन




परळी (प्रतिनिधी)...


  येथील पञकार महादेव गित्ते यांचे वडिल फुलचंद कोडिंबा गित्ते यांचे आज सोमवार दि.6 मार्च रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिव देहावर परळी तालुक्यातील मौजे मलकापुर येथे मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


   परळी तालुक्यातील मलकापूर येथील रहिवाशी फुलचंद कोडिंबा गित्ते यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना परळी येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी लातुर येथे हलवण्यात आले होते. याच दरम्यान त्यांची प्राणजोत मालवली मृत्यू समयी त्यांचे वय 63 वर्षाचे होते.फुलचंद कोडिंबा गित्ते हे धार्मिक व सुस्वभावी तथा मनमिळाऊ वृत्तीचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुल,सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे.गित्ते परिवाराच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार