चि.जय वैजनाथ माने याचे दहावी परीक्षेत उत्तुंग यश




*परळी वैजनाथ/ प्रतिनिधी*


येथील अभिनव विद्यालयाचा विद्यार्थी चि.जय वैजनाथ माने याने महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा इयत्ता दहावी मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. त्याने ९७.६० टक्के गुण घेतले आहेत.

परळी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री वैजनाथ माने यांचा मुलगा जय हा अभिनव विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 478 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. संस्कृत या विषयात त्याने पैकीच्या पैकी 100 गुण घेतले असून इंग्रजी विषयात 94 गणित मध्ये 96 सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात 94 तर सोशल सायन्स मध्ये 94 व मराठी मध्ये 82 गुण घेतले आहेत. चि. जय हा लहानपणापासूनच अत्यंत गुणी व हुशार असून त्याने आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार