इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

निवड : शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळी शहराध्यक्षपदी ॲड. जीवनराव देशमुख

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

       खा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी शहराध्यक्षपदी ॲड. जीवनराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये परळी शहराध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.  जीवनराव  देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी बीड येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी परळी येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, ज्येष्ठ नेते सुदामतीताई  गुट्टे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

     दरम्यान, खा. शरदचंद्र पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा आणि पक्षाला बळकटी देण्याचा येणाऱ्या काळात आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी या निवडीनंतर व्यक्त केली आहे.


Video:



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या