परळीचे सुपत्र चि.ओमेश सातभाई याची इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड: बाजीराव धर्माधिकारी यांनी केला सत्कार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

       परळीचे सुपत्र चि.ओमेश सातभाई याची इंग्लंडमध्ये लंडनच्या प्रतिष्ठित नॉटिंगहॅम बिझनेस स्कूलमध्ये  उच्च शिक्षणासाठी निवड झाली.त्याबद्दल माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सत्कार केला.

            माणिक नगर मधील श्री.हरिभाऊ सातभाई यांचे कनिष्ठ चिरंजीव ओमेश सातभाई यांची गुणवत्ता ओळखून नॉटिंगहॅम बिझनेस स्कूलमध्ये  विद्यापीठाने ओमेशला शिष्यवृत्ती बहाल केली आहे. ही परळीसाठी खूप अभिमानास्पद बाब आहे.

        ओमेश हा परळीच्या रत्नांच्या खाणीतील एक "अनमोल रत्न" असून एक अष्टपैलू विद्यार्थी आहे.विशेष म्हणजे २६ वर्षाच्या या तरुणाने पुण्यात व्हायब्रंट ग्रुपच्या माध्यमातुन स्वतःचे 3 व्यवसाय उभे केले आहेत.ओमेश स्वतः सोलारची कन्सल्टिंग करतो, तो विविध जीममध्ये "योगा टीचर" म्हणून देखील सेवा देतो..पुणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्या NGO चा घटक असून तो तबला विशारद पण आहे.

      या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी चि.ओमेश याचा हृदयसत्कार केला यावेळी त्याचे वडील हरिभाऊ सातभाई, किरण सावजी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !