प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

केदारेश्वर मंदिरात श्रावणानिमीत्त किर्तन,नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने आकर्षक रोषणाई व पुष्पसजावट

एक लोटा जल नव्हे तर महादेव भक्तीसाठी पसाभर पाण्याची गरज-ह.भ.प.रामराव महाराज ढोक

केदारेश्वर मंदिरात श्रावणानिमीत्त किर्तन,नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने आकर्षक रोषणाई व पुष्पसजावट  





अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 

सध्या काहीजण एक लोटा जल समस्या का हल असा प्रसार करत आहेत.परंतु वारकरी सांप्रदायात सातशे वर्षापुर्वी संत नामदेवांनी पसाभर पाणी एक बेलाचे पान महादेव भक्तीसाठी पुरेसे असल्याचे प्रतिपादन रामाणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी केले.अंबाजोगाई शहरातील जागृत देवस्थान केदारेश्वर येथील कीर्तनात ढोक महाराज बोलत होते.

       सोमवार दि.11 सप्टेंबर रोजी रात्री केदारेश्वर मंदिरात नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वतिने ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते.यानिमीत्त केदारेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व पुष्पसजावट करण्यात आली होती.आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१ नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।पती लक्षुमीचा जाणतसे ॥२॥ सकळ जिवांचा करितो सांभाळ ।तुज मोकलील ऐसें नाही ॥३॥ जैसी स्थिति आहे तैशापरी राहे।कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥ एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।हरिकृपें त्याचा नाश आहे ॥५॥ या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर विमोचन करताना ढोक महाराज म्हणाले की,सध्या हा देव मोठा तो लहान असा भेदभाव केला जात आहे.साधु- संतांनी असा भेदभाव न करता ज्याला ज्या देवाचे भजन करावयाचे त्याने भजन करावे असे सांगितले आहे.विष प्राशन केलेले असले तरी महादेव रंगाने गोरा व विष्णुने अमृत प्राशन केलेले असले तरी सावळा आहे.विष्णुचा उपवास हा एकादशी तर महादेवाचा उपवास सोमवार आहे.अलिकडील काळात अनेकजण देवाच्या भक्तीबाबत वेगवेगळे मार्ग सांगत आहेत परंतु इश्वर भक्तीचे सर्व मार्ग वारकरी सांप्रदायातील साधु-संतांनी सांगितले असल्याचे ढोक महाराज म्हणाले.

@@@@@@@

नियोजन व सजावटीचे कौतुक

 ह.भ.प.रामराव ढोक महाराजांनी किर्तनाच्या सुरुवातीस नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे व सहसचिव प्रदिप खाडे यांनी केदारेश्वर मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई व पुष्पसजावटीचे कौतुक करत पवित्र श्रावण महिन्यात किर्तनाचे आयोजन करुन मोठे पुण्य वाटुन घेतले असल्याचे सांगितले.या किर्तनास   यावेळी कीर्तनसास राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, लोमटे, विनायक गुट्टे, प्राचार्य अतुल दुबे, महादेव फड आदीसह शेकडो भाविक उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या