सौ. सुमनबाई जगन्नाथराव जाधव यांचे निधन

 श्री जगन्नाथ जाधव यांना पत्नीशोक



सौ. सुमनबाई जगन्नाथराव जाधव यांचे निधन

परळी (प्रतिनिधी) अंबाजोगाई येथील प्राध्यापक श्री अशोक जाधव व परळी येथील हॉटेल मैत्री चे मालक श्री संतोष जाधव यांच्या मातोश्री सौ. सुमनबाई जगन्नाथराव जाधव यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी यांचे वय 70 वर्ष होते. बँक कॉलनी भागातील सौ. सुमनबाई जगन्नाथराव जाधव यांचे आज गुरुवार सायंकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी सकाळी 10- 30 वाजता परळी वैद्यनाथ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे नातेवाईक श्री पंडित बापुराव तपके यांनी सांगितले आहे.

अंत्ययात्रा त्यांचे राहते घर बँक कॉलनी अंबेजोगाई रोड येथील निघणार आहे. सौ. सुमनबाई जगन्नाथ जाधव यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार