चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या नाहक चर्चांनी अस्वस्थता: पण हीच ती वेळ एकमेकांना जपण्याची
#जोशींचीतासिका
सध्या सर्वत्र अफवांचा बाजार पिकलेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे षड्यंत्र कार्यरत झाले आहे. याचे फटके संबंधित मल्टिस्टेट किंवा पतसंस्थाना बसत आहेतच पण सोबतच ठेवीदार अस्वस्थ झालेत हे सारे झाले आहे फक्त अफवांमुळे.
अफवा किंवा कम्युनिकेशन गॅप काय अनर्थ घडवू शकतो याचे प्रात्यक्षिक मी पहिल्यांदा अनुभवले ते अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात प्रशिक्षण घेत असताना. बहुधा मे १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे यशस्वी अणू चाचणी केली होती. तेव्हा आमच्या वर्गात जवळपास तीनशे प्रशिक्षणार्थी बसलेले असताना. आमच्या प्रशिक्षकांनी एक प्रयोग केला. त्यात त्यांनी एक विद्यार्थ्याच्या कानात काहीतरी सांगितले, त्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते दुसऱ्याच्या कानात सांगितले. त्यानंतर असेच करत करत शेवटच्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते वर्गाला ऐकवयायचे होते.
त्यात प्रयोगात शेवटच्या विद्यार्थ्याने आम्हांला जे ऐकवले ते काहीसे असे होते की 'अटलने जयला पत्र लिहिले' मुळात पहिल्या विद्यार्थ्याला सांगितले गेलेले वाक्य होते की 'अटल बिहारी वाजपेयींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान असा नारा दिला'. थोडक्यात एकाच ठिकाणी उपस्थित असून एकजण दुसऱ्याला सांगताना मोठा विपर्यास होऊ शकतो.
इथे तर कोणतीही आर्थिक संस्था, तिचे संचालक, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक आणि ज्यांचा संस्थेशी दुरान्वये संबंध नाही अशा लाखो करोडो लोकांमध्ये अर्थाचा काय अनर्थ काढला जात असावा.
बीडच्या ज्ञानराधाच्या अफवे नंतर परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ही क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाबत अशीच अफवा शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी पसरवली गेली. आता हे लक्षात घ्या हुशारीने शुक्रवार निवडला गेला असणार जेणेकरून शनिवार, रविवारी बँकेला सुट्टी त्यांनंतर सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक जयंती असल्याने बँकांना सुट्टी होती. या तीन दिवसांत अफवा वाऱ्यासारखी पसरली. नको त्या चर्चांना उधाण आल्याने सामान्य ग्राहक वर्ग अस्वस्थ होणे स्वाभाविक होते.
त्यानंतर बोटावर मोजता येईल इतक्या अतिउत्साही लोकांनी मल्टिस्टेटच्या काही शाखांत जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो इतर सुजाण ग्राहकांनीच उधळून लावला. यासाठी परळीकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
आता थोड्याश्या तांत्रिक बाबी समजून घेवू; कोणतीही बँक ही तिच्या ठेवींच्या सत्तर टक्के रक्कम कर्ज देऊ शकते. काही रक्कम बँक स्थावर मालमत्ता किंवा इतर आर्थिक संस्थांत गुंतवणूक केली जाते. राजस्थानी मल्टिस्टेटने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ठेवी जवळपास २८३ कोटींच्या आहेत तर सुमारे २२९ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. गुंतवणूक आहे २८.३० कोटींची तर तर संस्थेच्या स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य अंदाजे १५१ कोटी आहे.
आता कल्पना करा की अफवा पसरल्यावर जर अचानकपणे ठेवीदारांची झुंबड उडाली तर काय होईल? कोणतीतरी आर्थिक संस्था सर्वांना एकरकमी रक्कम एकाच दिवसांत कशी देऊ शकेल? इथे राष्ट्रीयकृत बँका असो किंवा दस्तुरखुद्द आर.बी.आय. त्यांना हे शक्य नाही. जसे काही ठेवीदार मुदतपूर्व ठेवींच्या संपूर्ण रक्कम मागत आहेत तसे कर्जदार बँकेला एकाचवेळी मुदतपूर्व कर्ज परत करू शकतील का? तसेच बँकही त्यांच्या कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज कसे वसूल करू शकेल? याचाही विचार व्हायला हवा. बँकिंग व्यवस्थेत विश्वास महत्त्वाचा आहे तो संस्था आणि ग्राहक दोघांनी जपला तरच गणित चपखल बसते अन्यथा विघ्नसंतोषी लोकांचे फावते.
संस्थाचालक चंदूलाल बियाणी यांचे वकीलपत्र घेऊन मी आज लिहीत नाहीये. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे शहराच्या विकासातील निर्विवाद योगदान सर्वश्रुत आहे. मुळात ज्याचा पैसा आहे त्याची भीती रास्त आहे पण एका फुटकळ अफवेवर विश्वास ठेवाल संस्था आणि तुम्हीही अडचणीत याल. आज राजस्थानी मल्टिस्टेटच्या अफवेनंतर शहरातील काही लहान मोठ्या पतसंस्थांना त्याचा फटका बसयला सुरुवात झाली आहे. यामुळे परळी वैजनाथ शहराचे अर्थचक्र अडचणीत येण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. आगामी काळात खाजगी सावकारी बोकाळली तर लोकं देशोधडीला लागतील. आपण नेहमीप्रमाणे एकमेकांना साथ देणे अत्यावश्यक आहे. जर शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील आर्थिक संस्था टिकल्या तर सामान्य वर्ग जगेल.
याआधीही परळीकरांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत त्यात कोणीही राजकीय हेतूने सामील झाले नाही. उदाहरणार्थ शहरात राबविलेली वृक्षसंवर्धन चळवळ, भारनियमन मुक्ती, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, केरळला नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेली मदत फेरी, परळी अंबाजोगाई रस्त्यासाठी घेतलेली सामूहिक भूमिका, कु. सानवी चौंडेला दुर्धर आजारात मदत करण्यासाठी केलेली मदत फेरी (यातून तिच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू झाले आहेत) असे अनेक उपक्रम सांगता येतील ज्यात परळीकर जात, धर्म, पंथ न पाहता एकमेकांच्या मदतीसाठी हिरीरीने पुढे सरसावतो.
आता पुन्हा एकदा वेळ आली आहे आपण सर्वांनी Collective Efforts घेऊन राजस्थानी मल्टिस्टेटसह शहरातील इतर आर्थिक संस्थांना आधार द्यायची. मला खात्री आहे प्रभू वैद्यनाथाच्या आशिर्वादाने सर्व काही लवकर सुरळीत होईल.
*राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*
१. तुमच्या प्रत्येक शाखेबाहेर तुमच्या संस्थेचा आर्थिक ताळेबंदाचे होर्डिंग्ज लावणे.
२. होर्डिंग्जवर सर्व संचालकांचे नावं, चालू मोबाईल नंबर देणे जेणेकरून ग्राहकांना वेळीच शंकानिरसन करून घेता येईल.
३. तज्ज्ञ लीगल एडव्हायझर बोर्ड नेमून त्यांचीही नावं, मोबाईल नंबरसह माहिती देणे
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर भिषण आपघात घडला असुन परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.एकावर उपचार करण्यात येत आहेत. अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भिषण आपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळीतील तीन युवक मोटरसायकलवरुन परळीकडे येत असताना उसाच्या ट्रॉलीवर धडकुन आपघात घडला. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले.या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे राहणार बँक कॉलनी,रोहित भराडीया राहणार पद्मावती गल्ली,शुभम धोकटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडू...
*करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय* परळी (दि. 05, प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात ...
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी... शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढ...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा