प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी-संजय देशमुख

 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका जातीचे नव्हते तर ते जागतिक नेते होते-प्रा .डॉ विनोद जगतकर





बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी-संजय देशमुख


लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)

         महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका जातीचे नव्हते तर ते जागतिक नेते होते. तर बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष संजय देशमुख यांनी केले.क्षयेथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

      लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, इतिहास विभागप्रमुख प्रा डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ विनोद जगतकर पुढे म्हणाले की,मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. जगात सर्वात जास्त पुतळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. तर बाबासाहेबांचा विचार सर्वांच्या कल्याणाचा विचार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप संस्थाध्यक्ष संजय देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ राजश्री कल्याणकर, प्रास्ताविक प्रा प्रवीण फुटके यांनी तर आभार प्रा डॉ प्रविण दिग्रसकर यांनी केले. कार्यक्रमास  शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या