MB NEWS:कोष्टी समाज परळी आयोजित श्री चौंडेश्वरी पारायण सोहळयाची 6 जानेवारीला भव्य ग्रंथदिंडीने होणार सांगता

 कोष्टी समाज परळी आयोजित श्री चौंडेश्वरी पारायण सोहळयाची 6 जानेवारीला भव्य ग्रंथदिंडीने होणार सांगता




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)


मागील सहा दिवसांपासून गुरूकृपानगर येथील श्री हरेगावकर यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळयाची शुक्रवार दि.6 जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त होम हवन, ग्रंथ दिंडी आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती कोष्टी समाज परळीच्या वतिने देण्यात आली.

गुरूकृपानगर येथे कोष्टी समाज परळीच्या वतिने चालू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी पुराण पारायण सोहळयाची सांगता दि.6 जानेवारी रोजी होत आहे. श्री रामलिंग चौंडेश्वरी पुराण पारायणाचे वाचन सौ.लताताई येळाये यांच्या मधूर व  रसाळ वाणीतून चालू आहे. शुक्रवार दि.6 जानेवारी रोजी सांगता निमित्त सकाळी 5.30 वा. विधीवत होम हवन होत असून 7.30 वा. श्री विष्णू सहस्त्रनाम पारायण, 11 वाजता ग्रंथ दिंडी असे कार्यक्रम होणार आहेत. 

ग्रंथ दिंडी सकाळी 11 वा. गुरूकृपानगर येथील श्री हरेगावकर यांच्या निवासस्थानापासून निघणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून दिंडी जाणार आहे. या दिंडीत ग्रंथासोबतच कलशधारी महिला, भजनी मंडळ सहभागी होणार आहे. 

या ग्रंथ दिंडी सोहळयास कार्यक्रमास समाज बांधव तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोष्टी समाज परळीच्या वतिने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!