इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात तृतीय

 महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात तृतीय




परळी / प्रतिनिधी: 


परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयाने स्पर्धा परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बुधवार दि 4 रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली असून यामध्ये

शाळेची विद्यार्थीनी कु.श्रद्धा सुनील तारे ही परळी तालुक्यातुन ग्रामीण भागातून सर्व तृतीय आली आहे. 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.


परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा या शाळेतील कु. तारे श्रद्धा सुनील ह्या विद्यार्थिनीं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले होते. बुधवार दि 4 रोजी परीक्षा परिषदेने गुणवत्ता यादी जाहीर केली असून कु.श्रद्धा तारे ही तालुक्यात ग्रामीण भागातून सर्व तृतीय आली आहे.तिच्या  या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव, सर्व संचालक मंडळ, शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख तथा उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....