MB NEWS:रवी नेमाने यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

 रवी नेमाने यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड



परळी प्रतिनिधी.   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा सचिव रवी नेमाने यांची नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.याबाबत वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष संजय नाईक यांनी नेमाने यांना नियुक्ती पत्र दिले.

     मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक तसेच मनसेचे पहिले परळी तालुका अध्यक्ष म्हणून रवी नेमाने यांनी काम पाहिले होते.सध्या ते मनसेचे बीड जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष संजय नाईक, मनसे नेते दिलीप धोत्रे,मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, सचिव संतोष नागरगोजे, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष आरेफ भाई शेख, राज्य उपाध्यक्ष माऊली थोरवे आदिंनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

    या निवडीनंतर रवी नेमाने यांनी पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती सार्थ ठरवून राज ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.नेमाने यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार