महत्त्वपूर्ण विषय:अत्यंत आवश्यक मुद्दा

 वैद्यनाथ मंदिरात भाविकांशी असभ्यवर्तन करणाऱ्या सुरक्षारक्षकांना शिस्त लावा संभाजी ब्रिगेडची  मागणी




परळी वैजनाथ....

येथील वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकांना शिस्त लावावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रभू  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशासह जगभरातून भावीक भक्त येतात. मंदिरात शिस्त लावण्यासाठी महिला सुरक्षारक्षक आहेत पण या सुरक्षारक्षक भाविकांसोबत असभ्यवर्तन करत असतात असे अनेक वेळा आढळून आले आहे. आरडाओरडा करून बोलणे, भाविकांवर रागावणे, भाविकांसोबत गैरवर्तन करणे, भाविकांना अपमानास्पद वागणूक देणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या महिला सुरक्षारक्षकांची दुसऱ्या ठिकाणी ड्युटी लावून त्या ठिकाणी सभ्य वागणुकीसाठी तंबी देऊन दुसऱ्या महिला सुरक्षारक्षक नेमाव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वैद्यनाथ देवल कमिटी अध्यक्ष तथा परळी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !