युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

रविवारी परळी वैद्यनाथ तालुक्यातील गोगलगाय बाधित शेतीची करणार पाहणी

 तत्परता: कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर


रविवारी परळी वैद्यनाथ तालुक्यातील गोगलगाय बाधित शेतीची करणार पाहणी


परळी वैद्यनाथ (दि. 22) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. 


कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11:00 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक सूचना देतील असे ना. धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयातून कळवण्यात आले आहे. 


मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी, अंबाजोगाई व केज या तीन तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकास गोगलगायी नष्ट करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे हे स्वतः या क्षेत्राची पाहणी करणार असून, कृषी विभागाचे अधिकारीही या दौऱ्यात सहभागी असतील.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या