प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड जिल्हयातील परळी दौरा कार्यक्रम

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड जिल्हयातील परळी दौरा कार्यक्रम


       बीड, 4 (जिमाका) :  मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कायक्रमासाठी येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.


       मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1.25 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व हेलीकॉप्टरने परळी जि. बीडकडे प्रयाण.


दुपारी 2.15 वाजता शक्ती कुंज वसाहत थर्मल कॉलनी हेलीपॅड परळी जि. बीड येथे आगमन व मोटारीने श्री क्षेत्र परळी वैजनाथ मंदिराकडे प्रयाण.


              दुपारी 2.25 वाजता श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ मंदीर येथे आगमन, दर्शन व तीर्थक्षेत्र विकास कामाचे भुमीपूजन.दुपारी 2.35 वाजता मोटारीने ओपळे मैदान, परळीकडे प्रयाण.


 दुपारी 2.45 वाजता परळी येथे ओपळे मैदानावर आगमन “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास उपस्थिती.


सायंकाळी 4.15 वाजता मोटारीने शक्ती कुंज वसाहत थर्मल कॉलनी हेलीपॅड, परळीकडे प्रयाण.


 सायंकाळी 4.30 वाजता शक्ती कुंज वसाहत थर्मल कॉलनी, हेलीपॅड परळी येथे आगमन हेलीकॅप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या