प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार

 परळीत येण्याआधीच शासन आपल्या दारीच्या पूर्वसंध्येला सरकारने दिली परळीला दिली 140 कोटींची भेट


सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील 26 रस्त्यांच्या कामांस 141 कोटी 70 लक्ष रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त

धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार


परळी वैद्यनाथ (दि. 04) - परळीत आज राज्य शासन आपल्या दारी येत असून शासनाने परळीत येण्याच्या पूर्वसंध्येलाच परळीवासीयांना तब्बल 141 कोटी रुपयांच्या विकास कामांची भेट दिली आहे. 


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेमार्फत प्रस्तावित केलेल्या  रस्ते व नाल्यांच्या 26 महत्वाच्या कामांना 141 कोटी 70 लक्ष रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे. 


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. 


दरम्यान आज राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असुन, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सुमारे 1500 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर जिल्ह्यातील तब्बल 22 हजार लाभार्थींना विविध शासकीय योजनांच्या लाभाचे थेट वितरण करण्यात येणार आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या