इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

मोठी बातमी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे शासन आपल्या दारी कार्यक्रमात राहणार उपस्थित

 मोठी बातमी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे शासन आपल्या दारी कार्यक्रमात राहणार उपस्थित




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
          परळी वैजनाथ येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम आज होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ,मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे या सुद्धा आता उपस्थित राहणार आहेत.
          परळी वैजनाथ येथे आज दिनांक पाच रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाची भव्य दिव्य तयारी करण्यात आली आहे. तसेच परळीत येणाऱ्या मंत्रिमहोदयांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागताच्या तयारीतच सगळ्या कट आउट व होर्डिंग्जवर पंकजा मुंडे यांची छायाचित्रे झळकले होते. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली असून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या परळी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसमवेतच हेलिकॉप्टरने परळी येथे येणार असून गोपीनाथगडावर त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री  यांचे स्वागत करणार आहेत. त्याचप्रमाणे त्या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. मुख्य कार्यक्रमस्थळीही पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती हाती आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट