इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी परळी सज्ज

असा आहे आजचा कार्यक्रम क्रम : गोपीनाथगड ,वैद्यनाथ मंदिर, छत्रपती शिवरायांना वंदन: स्वागत रॅली  त्यानंतर मुख्य शासकीय कार्यक्रम


        बीड, 3 (जिमाका) : शासन आपल्या दारी  या विशेष कार्यक्रमासाठी  बीड जिल्ह्यातील परळी शहर सज्ज झाले असून मंगळवार दिनांक पाच डिसेंबर 2023 ला वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी विकासकामांचे भूमिपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तसेच काही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार आहे 

या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी आदींची उपस्थिती राहणार आहे.


या ठिकाणी भव्य मंडप उभारले  आहेत.प्रतिनिधी लाभार्थ्यांची बसण्याची व्यवस्था मंचावर केलेली आहे. सभा मंडपाच्या परिसरात लाभार्थ्यांना वितरित होणारे साहित्य मांडण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट मिळावा म्हणून विभागाच्या वतीने दालने उभारण्यात येत आहेत. याची अंतिम पाहणी आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केली. यावेळी बारकाईने सर्व बाबींकडे अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित करून कोणाचीही गैरसोय होणार नाही असे निर्देशित केले.



शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह सर्व मान्यवर सुरुवातीला गोपीनाथगड (पांगरी) येथे येणार असून त्याठिकाणी ते लोकनेते दि. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतील व त्याठिकाणी 286.68 कोटी रुपयांच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे भूमिपूजन करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांना वंदन केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन आयोजित स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅली नंतर थेट कार्यक्रम स्थळी वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदान येथे येतील व मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरुवात होईल.


शासकीय कार्यक्रमाच्या अगोदर होणार अभूतपूर्व स्वागत


दरम्यान शासकीय कार्यक्रमास सुरुवात होण्या अगोदर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात प्रथम आगमनानिमित्त सर्व मान्यवरांच्या अभूतपूर्व स्वागत रॅलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात येत आहे.


या स्वागत रॅली मध्ये मणिपूर, केरळ, तिरुपती बालाजी, आंध्र प्रदेश, पंजाब, मुंबई आदी सहा ठिकाणावरून खास बँड पथक पाचारण करण्यात आले आहेत. तसेच पुष्पवृष्टी व रोषणाईद्वारे अभूतपूर्व स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. या रॅलीचा शेवट मौलाना आझाद चौकात आल्यानंतर होईल व त्यानंतर मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरुवात होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या