प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शेकडो कोटींच्या कामांचा होणार मंगळवारी शुभारंभ, तर अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण

 परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात होणार विकासाची नवी नांदी!


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांसह मान्यवर राहणार उपस्थित


शेकडो कोटींच्या कामांचा होणार मंगळवारी शुभारंभ, तर अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण


विविध शासकीय योजनांच्या जिल्ह्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना होणार थेट लाभाचे वितरण


परळीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या व महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मान्यवरांचे होणार अभुतपूर्व स्वागत


परळी वैद्यनाथ (दि. 03) - बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे मंगळवार दि.5 डिसेंम्बर रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेकडो विकासकामांचे भूमिपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तसेच काही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार असून, हा कार्यक्रम बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरणार आहे. 


या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी आदींची उपस्थिती लाभणार आहे. 


*या कामांचा होणार शुभारंभ*


परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी उभारणीचे भूमिपूजन, परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286 कोटी 68 लाख रुपयांच्या आराखड्याचे भूमिपूजन, परळी तालुक्यात कृषी विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या तीन शासकीय संस्था उभारणीच्या 311 कोटींच्या कामांचे भूमिपूजन, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या 61 कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन, परळी शहर बसस्थानकाच्या सुधारित कामाचे भूमिपूजन, यांसह बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिरसाळ्यात उभारण्यात आलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे लोकार्पण आणि जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना विविध योजनेतील लाभाचे थेट वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. 


*असा असेल मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचा एकूण कार्यक्रम*


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह सर्व मान्यवर सुरुवातीला गोपीनाथगड (पांगरी) येथे येणार असून त्याठिकाणी ते लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतील व त्याठिकाणी 286.68 कोटी रुपयांच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे भूमिपूजन करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांना वंदन केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन आयोजित स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅली नंतर थेट कार्यक्रम स्थळी वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदान येथे येतील व मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरुवात होईल. 


*शासकीय कार्यक्रमाच्या अगोदर होणार अभूतपूर्व स्वागत*


दरम्यान शासकीय कार्यक्रमास सुरुवात होण्या अगोदर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात प्रथम आगमनानिमित्त सर्व मान्यवरांच्या अभूतपूर्व स्वागत रॅलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात येत आहे. 


या रॅलीसाठी संपूर्ण परळी शहर दिवाळी सारखे सजले असून, या रॅलीत महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. 


या स्वागत रॅली मध्ये मणिपूर, केरळ, तिरुपती बालाजी, आंध्र प्रदेश, पंजाब, मुंबई आदी सहा ठिकाणावरून खास बँड पथक पाचारण करण्यात आले आहेत. तसेच पुष्पवृष्टी व रोषणाईद्वारे अभूतपूर्व स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. या रॅलीचा शेवट मौलाना आझाद चौकात आल्यानंतर होईल व त्यानंतर मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरुवात होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या