पशुधनाची चोरी: चोऱ्या वाढल्या

 दुष्काळाच्या झळा - चोर्‍यामार्‍या वाढल्या: अंबलटेकमधून दोन गाईंची गोठ्यातून चोरी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     यावर्षी दुष्काळी झळा सहन कराव्या लागत आहेत या दरम्यानच चोर्‍यामार्‍यांच्या घटनांतही मोठी वाढ झाली आहे.ग्रामीण भागात पशुधन चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अंबलटेकमधून दोन गाईंची गोठ्यातून चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी निवृत्ती पाडुरंग मुंडे वय 33 वर्षे व्यवसाय- शेती रा.अंबलटेक यांची काळ्या चांभळ्या रंगाची एक गाय तीची किमंत अंदाजे 20000 रुपये व याच गावात राहणारे  धनराज भगवान नागरगोजे यांची एक लाल रंगाची गाय किमंत अंदाजे 25000 रुपये राहते घरुन गाईच्या गोठ्यातुन चोरीस गेल्या आहेत. या दोन गाई पांढ-या रंगाच्या पिकप मधील चार अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेवुन चोरुन नेल्या असल्याचा कयास आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह पी.व्ही. वाले हे करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !