इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

कष्ट आणि निष्ठेचं फळ काय ?

 आपले कष्ट आणि निष्ठा निरर्थक जाणार नाही !




शरदचंद्र पवार यांनी राजेभाऊ फड यांना लिहिले पत्र


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना पत्र पाठवून आपल्या भावना कळवल्या आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात आपण घेतलेली मेहनत आणि कष्टाला निरर्थक जाऊ देणार नाही. तुम्ही केलेल्या कामाची पक्षाने नोंद घेतली असून आपल्याला भविष्यात योग्य न्याय दिला जाईल असा शब्द त्यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना दिला आहे 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी युवक नेते राजेभाऊ फड यांना नुकतेच पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राजेभाऊ फड यांचे कौतुक केले असून, पक्षाचे मतविभाजन होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेली माघार अभिनंदनीय असल्याचे म्हटले आहे. इच्छुक उमेदवार संख्या जास्त असल्याने त्यातून उमेदवार देत असताना मानाची घालमेल होत असून, आपण पक्षासाठी केलेलं काम आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा निरर्थक जाऊ देणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. जनकल्यानाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागायचे असून आपल्या कामाची आणि आपल्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेची आम्ही नोंद घेतली असल्याचेही शरदचंद्र पवार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट