प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 हेळंब येथे श्री खंडोबा यात्रोत्सव 7 ते 9 डिसेंबर ; यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-  तालुक्यातील हेळंब येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबाची यात्रा दि. 7 ते 9  डिसेंबर रोजी होत असून यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील भाविक येत असल्याने ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.

 हेळंब येथे श्री खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत असते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा अवघ्या काही दिवसावर आली असुन यात्रेची नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानाची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावो गावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छते सह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये दि.7 ते 9 डिसेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु आदींसह कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. यात्रे दरम्यान भाविकासह व्यापाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

 श्री खंडोबाचे मंदिर हे हेळंब पासुन १ किलोमिटर अंतरावर आहे.  श्रींच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगल होणार आहे. गावातील युवक व खंडोबा भक्त यात्रेच्या तयारीला लागले आहेत. घरोघरी माहेर वासियांनी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु आहे. कामानिमित्त बाहेर गावी गेलेले नागरिकही यात्रेनिमित्त आवर्जुन गावाकडे येतात. दरम्यान पंचक्रोशीतुन मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने ग्रामीण पोलिसांच्या वतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या