प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

 'काही दिवसापुर्वीही काढली होती छेड: आता थेट डोळा मारला - "जानेमन घरात चला" म्हणत परळीतअल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीविरुद्ध विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


परळी वैजनाथ,  एमबी न्यूज वृत्तसेवा.....

           संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अझादनगर ते मिलिंदनगर रस्त्यावरील एका किराणा दुकानाच्या जवळून जात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली.याप्रकरणी आरोपी विरुध्द विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिलिंद नगर भागात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  फिर्यादी अल्पवयीन मुलगी व दुसरी एक मुलगी अशा दोघीजणी एका किराणा दुकानाच्या जवळून जात असताना आरोपी  फिरदौस इसाद मोहमंद शेख रा. फुकटपुरा परळी हा उभा होता. दोन मुली तेथून जात असताना त्याने दोघींकडे पाहून डोळा मारला. जाने मन असे म्हणून मुलीच्या खांद्यावर हात टाकून घरामध्ये चल असे म्हणू लागला. तेव्हा  तक्रारदार मुलीने विरोध केल्यानंतरही आरोपीने बळजबरीने अंगावर वाईट हेतूने लज्जा वाटेल असा हात टाकला व घरी कोणाला सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. मुलगी मागासवर्गीय असल्याचे माहीत उत्सूनही त्याने जातीवाचक शिवीगाळ केली. या गंभीर प्रकरणी पीडित मुलीने भाऊ, मावशी यांना सांगित्यानंतर या मुलीला संभाजीनगर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी  या आरोपी विरूध्द कलम ७५ (१) (i), ७५ (iv), ७८ (१) (i), ३५१ (२), ३५५ (३) प्रमाणे  गुन्हा दाखल केलक आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संभाजीनगर पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या