बीड लोकसभा मतदारसंघासाठी पंकजाताई मुंडे

 बीड लोकसभा मतदारसंघासाठी पंकजाताई मुंडे




परळी प्रतिनिधी......
    आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या  यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे.  नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार