संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदी अँड.संतोष केंद्रे यांची नियुक्ती

 सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदी अँड.संतोष केंद्रे यांची नियुक्ती



परळी (प्रतिनिधी)

        मूळचे परळीचे असलेले व  सध्या छञपती संभाजी नगर येथे असलेले प्रसिद्ध वकील ॲड.संतोष केंद्रे यांची राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेल्या छ्त्रपती संभाजी नगर येथे सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

        अँड संतोष नागनाथराव केंद्रे  हे मूळचे परळीचे असून मागील तेवीस वर्षांपासून ते छत्रपती संभाजी नगर येथे उच्य न्यायालयाच्या खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. अनेक खाजगी व शासकीय संस्थेवर ते विधी सल्लागार म्हणून काम पाहतात. उच्च न्यायालयातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांची सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर नियुक्ती केली आहे.

          सन २००९ या वर्षीही शासनाने त्यांची याच पदावर नियुक्ती केली होती.त्यांच्या या नियुक्ती बद्दल मित्र परिवार तसेच वकील मंडळी, नातेवाईक,स्नेही आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....