इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार

 20 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील परळीत!



भव्य महासंवाद बैठकीचे आयोजन


परळी (प्रतिनिधी)

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 20 मार्च रोजी परळीत येत असून, ते सकल मराठा समाजाची महा संवाद बैठक घेणार आहेत. या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येत असून यासंदर्भातील सकल मराठा समाजाची नियोजन बैठक मंगळवारी परळीत संपन्न झाली.


मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यभर मराठा समाजाच्या संवाद बैठका घेत आहेत. आरक्षणाबाबत दशा आणि दिशा याबद्दल ते महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मार्गदर्शन करत आहेत. मराठा आरक्षणाची क्रांती भूमी असणाऱ्या परळी वैजनाथ शहरात मनोज जरांगे पाटील हे येत्या 20 मार्च रोजी येत असून, यानिमित्ताने भव्य महा संवाद बैठक संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्यासाठी मंगळवारी सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. सोज्वल मंगल कार्यालय येथे झालेल्या बैठकीस परळी तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 20 मार्च रोजी परळी वैजनाथ येथे होत असलेल्या कार्यक्रमास बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव हजारोंच्या संख्येने येणार आहेत. यासाठी कार्यक्रमाचे भव्य आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या