इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 स्वयंपाकघरातच गळफास लावून गृहिणीने संपविलं जीवन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       स्वयंपाकघरातच गळफास लावून एका गृहिणीने आपले जीवन संपविल्याची घटना दि.१६ रोजी सायंकाळच्या सुमारास परळी वैजनाथ येथील माणिकनगर भागात घडली आहे.याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, मयत 35 वर्षिय महिलेने माणीकनगर परळी वै . येथील राहते घरी स्वयंपाकघरातच स्लॅबच्या लोखंडी कडीला गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.दुर्गेश्वरी विजयकुमार बकरे असे मयत महिलेचे नाव आहे.याप्रकरणी मयत महिलेचा पती विजयकुमार उत्तमराव बकरे यांच्या खबरीवरुन पोलीस ठाणे परळी शहर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोह येलमटे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या