दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली !

एकनाथ घुले यांना पितृशोक; साहेबराव घुले यांचे निधन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) डायमंड हेअर ड्रेसरचे संचालक एकनाथ घुले यांचे वडील साहेबराव गोपीनाथ घुले यांचे अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षे होते. 

       साहेबराव घुले गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यातच आज गुरुवार दि. 16 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी प्राणज्योत मालवली. ते अतिशय धार्मिक आणि मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित होते. कै. साहेबराव घुले यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

     कै. साहेबराव घुले यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना, जावई असा भरगच्च परिवार आहे. डायमंड हेअर ड्रेसरचे संचालक अण्णाभाऊ घुले, रामचंद्र घुले, वाल्मिक घुले यांचे बंधू व एकनाथ साहेबराव घुले, हारिभाऊ घुले यांचे वडील होत.

    घुले परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !