इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

परळीसाठी मोठी उपलब्धी.....!

परळीत होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय ; ना.पंकजा मुंडे यांचे पशुसंवर्धन खात्याला आदेश

पशुविज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम उद्या परळीत येऊन करणार जागेची पाहणी

बीड।दिनांक ०८।

राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी परळीत शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. महाविद्यालयांसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी करण्यासाठी पशू विज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम उद्या रविवारी परळीत दाखल होत आहे, लवकरच या कामाला गती येणार आहे.

     राज्यात परळी वैजनाथ आणि बारामती या दोन ठिकाणी नवीन शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा ना. पंकजा मुंडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या दोन्ही ठिकाणी महाविद्यालय स्थापन करण्याकरिता मुलभूत सोयीसुविधांचे निरीक्षण व भारतीय पशू चिकित्सा परिषद नवी दिल्ली यांचे मानकानुसार आवश्यक असलेल्या बाबींच्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरिय निरीक्षण समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष तथा पशू विज्ञान विद्यापीठाचे डीन डाॅ. एस व्ही. उपाध्ये, डाॅ. जी. एस. खांडेकर, कनिष्ठ अभियंता डाॅ. पी.व्ही. तायडे, तांत्रिक अधिकारी डाॅ पी. इ. ताकसांडे हे उद्या रविवारी जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक तसेच सर्व संबधित अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

ना. पंकजाताईंनी घेतला आढावा

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ना. पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरणा सोबतच परळीत होणाऱ्या नवीन शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा आढावा घेतला होता. अधिकाऱ्यांच्या टीम कडून जागेचा   निर्णय घेतला येणार आहे, त्यानुसार उद्याची पाहणी होत आहे.

•••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या