प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 वसंतदादा पाटील महाविद्यालयात केशरबाई क्षीरसागर यांची जयंती साजरी

अमोल जोशी / पाटोदा - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २९ मार्च रोजी संस्थेच्या संस्थापिका कै. सौ. केशरबाई क्षीरसागर उर्फ 'काकू' यांची जयंती साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार मार्गदर्शन संस्थेचे प्रशिक्षक सुरेश बोचकुरे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सौ. केशरबाई क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, डॉ. पवनकुमार चांडक, डॉ. कल्याण घोडके, डॉ. संजय बोंडगे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे, डॉ. लक्ष्मण गाडेकर, प्रा. मनिषा गाढवे, डॉ. शकुंतला बडे, प्रा. मनिषा पाडिया, प्रा. विमल अलापुरे उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. कल्याण घोडके यांनी सौ. केशरबाई क्षीरसागर यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल थोडक्यात भाष्य केले. अभिवादन कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या