प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शेतकरी कीर्तन महोत्सव.....

 द्वेषाच्या वणव्यात प्रेमाचा गारवा!



अनंत राऊत यांच्या कावितेने शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन 


सिरसाळा (प्रतिनिधी): आज सर्वत्र जात्यंधता, धर्मांधतेचा वणवा पेटलेला पहायला मिळतोय. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पहातो आहे, अशा कळात संत विचाराच्या वर्षावाने प्रेमाचा गारवा निर्माण करण्याचे काम शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. संत विचारातून सामाजिक सलोखा निर्माण होईल, असा आशावाद प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केला. शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

कन्नापूर येथील बस स्थानकाजवळ जगद्गुरू तुकाराम महाराज बीजेनिमित्त शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन अनंत राऊत यांच्या उपस्थितीत झाले. काॅ. डी. एल. कराड हे अध्यक्ष स्थानी होते. जागतिक कीर्तीचे पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर आणि कैकाडी महाराज यांचे वंशज, कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव यांच्या हस्ते मृदंग आणि वीणा पूजन झाले. यावेळी बोलताना अनंत राऊत म्हणाले की, संतांच्या विचारधारेतून गावखेड्यातील सामाजिक सलोखा भक्कम होता. आमच्या गावच्या महादेवाच्या मंदिरातील हरिनाम सप्ताहात पठाण चाच्या कीर्तनकारामागे टाळ घेऊन उभे असत, तर मोहरमचा ताजिया सर्व हिंदू बांधव सजवीत असत. लहानपणी शाळेत सर्व जाती-धर्माचे आम्ही मित्र एकत्र जेवत असू. एकमेकाच्या डब्यात मोकळेपणाने हात घालून एकमेकाची भाजी भाकरी घेत असू. आज अचानक धर्म खतरे में असल्याच्या आरोळ्या कानावर येत आहेत. खर तर  ना हिंदू खरे में हैं, ना मुसलमान खतरें में है. यांचे राजकीय अस्तित्व खतरे में आलं की, तरुणांना धर्माच्या नावाने भडकविले जाते.  तेव्हा राजकीय लोकांच्या भूलथापांना बळी पडून गावातील सामाजिक सलोखा, बिघडू देऊ नका, असे आवाहनही राऊत यांनी केले.

संत तुकाराम महाराज हे समाजातील दांभिकतेवर प्रहार करणारे क्रांतीकारी कवी होते. त्यांनी धर्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या पाखंडाचे खडंण केले, म्हणून त्यांच्या गाथा बुडविण्यात आल्या. आज शेतकरी कीर्तन महोत्सवातून त्याच गाथेचा विचार समाजात रुजविण्याचे प्रयत्न होत आहेत, असेही कराड म्हणाले.

रात्रीच्या कीर्तनात ह.भ.प. हरिदास महाराज तम्मेवार यांनी तुकाराम महाराज यांचा 'जेथे कीर्तन करावे l तेथे अन्न न सेवावे' हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. त्यावर निरुपण करताना कीर्तन परंपरेला आलेल्या बाजारूपणावर प्रहार केला. वारकरी संप्रदायाचे विचार फक्त बोलण्यात नसावेत. जे मतदानासाठी पैसे घेत असतील, जे स्रीयांचा सन्मान करीत नसतील, जे समाजात जात्यंधता, धर्मांधता, अंधश्रद्धा पसरवत असतील,  त्यांनी बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, असे तुकाराम महाराज यांच्या भाषेत ठणकावून सांगितले.

वीणा-मृदंग पूजन प्रसंगी बोलताना उद्धव बापू आपेगावकर यांनी कठरपंथीयांकडू भक्ती परंपरेला लावला जात असलेला सुरुंग अधोरेखित केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील संत परंपरेने भेदभावाला, चमत्काराला थारा न देता सहिष्णुतेचा धर्म जपल आणि वाढवलाही. साधुसंताच्या या व्यापक वारस्याला अलीकडल्या काळात कठरपंथी विकृत धर्मवाद्यांकडून सुरंग लावण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील वारकरी चळवळीला हे उत्तरेकडील स्वयंघोषित संत तिलांजली देण्याची काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी या कीर्तन महोत्सवातून प्रयत्न होताना पाहून आनंद होत असल्याचा विश्वास पं. उद्धव बापू आपेगावकर यांनी व्यक्तकेला.

यावेळी बोलताना भारत महाराज जाधव यांनीही पाखंडावर कठोर शब्दांत प्रहार केले. कुणी अघोरी साधना केली. स्वतःच्या देहाला यातना दिल्या. त्याने जर दुसऱ्याचे कल्याण होत नसेल; तर असे चमत्कार काय कामाचे! शाही स्नानाने अंतकरण शुद्ध होत नसेल तर प्रयागराजला जाण्यात काय अर्थ आहे? यापेक्षा स्वतःचे अंतकरण शुद्ध करून माणसाने माणसासोबत माणसासारखे वागणे, तण मन अंत:करणाची स्वच्छता राखणे, मुलाबाळांना शिकवणे, हे संत नामदेव महाराज  -ज्ञानेश्वर महाराजांपासून ते आधुनिक संत घाडगे बाबा, तुकडोजी महाराजांपर्यंत महाराष्ट्राच्या मातीने जपली आहे. तीच धुरा हा शेतकरी कीर्तन महोत्सव पुढे नेत आहे', असे भारत महाराज जाधव म्हणाले.

----------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या