इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

आपल्या चिमुकल्या मुलीला लिहलं अखेरचं पत्र....

मन हेलावून टाकणारी घटना: विना अनुदानित आश्रम शाळेच्या शिक्षकाची कंटाळून आत्महत्या

        

       बीड शहरातील स्वराज्य नगर भागात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बॅकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. त्यांचा कशाप्रकारे छळ केला जात होता, याची सविस्तर माहिती दिली आहे.

धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. ते बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी होते. ते मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने या शाळेला 20 टक्के अनुदान घोषित केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. वेतन मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणीना सामना करावा लागत होता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फेसबूक पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय?

श्रावणी बाळा तुझ्या बापुला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. मी कधी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच, तर तुझ्या बापूला एकदा माफ कर. कारण मी तुला एकटीला सोडून जा तुला अजून काहीच कळत नाही, तुझं वय आहेच किती... तीन वर्षे... तुला काय कळणार.... ज्यांना कळायला पाहिजे होतं, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला.विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे काम करतोय. मला अजून पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती. पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्यायच या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर... मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही, तरी पण शक्य झालं तर, जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर... आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला... अशी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे.

    तसेच विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवत आहे. आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मोठ्या मनाने माफ करा. सर्वांना माझा शेवटचा राम राम.... अशी भावनिक पोस्ट नागरगोजे यांनी लिहिली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!