इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

1 मे रोजी परळी न्यायालयाच्या नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ !


मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी,मंत्री पंकजा मुंडे,न्या.रविंद्र जोशी, जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर राहणार उपस्थित 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

    परळी वैजनाथ येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

      नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते व पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद्र मधुसुदन जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड  आनंद लक्ष्मीचंद यावलकर हे भुषवणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन परळी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी दिपक रुस्तुमराव बोर्डे व परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड हरीभाऊ व्यंकटराव गुट्टे यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....