इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मधिल २४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

परळी / प्रतिनिधी

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे इयत्ता पाचवी व आठवीतील  विद्यार्थी  शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होत असतात,या ही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व प्रशालेतील तज्ञ शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे घेतलेले परिश्रम त्यामुळेच ईयत्ता पाचवीतील एकुण १३ तर ईयत्ता आठवीतील ११ असे २४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेसाठी निवड झाली असून सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी शुभेच्छा दिल्या. 


सदर शिष्यवृत्ती परिक्षेसाठी ईयत्ता पाचवीतील कु.पार्थ सज्जनशेट्टी, कु.आदित्य कराड, कु.आर्या लिंबकर, कु.आयुशकुमार मुंडे, कु.अबुजर खान, कु.अक्षरा रंजन, कु.गायत्री मुंडे, कु.मेहेर सामत,कु.समृध्दी कराड, कु.सेजल सोनवणे, कु.श्रेयश तुपकरे,कु.वेद चाटे व कु.विश्वजा देसाई यांची निवड झाली आहे तर ईयत्ता आठवीतील कु.अनुष्का बनसोडे, कु.अरशान शेख, कु. अथर्व गित्ते,कु.धनराज दौंड, कु.पार्थ घाटे, कु.प्रणाली गव्हाणे, कु.रिध्दी अन्नेमवाड,  कु.समिक्षा कराड, कु.वरद खाडे, कु.वेदीका काळे, कु.यश फड यांची निवड झाली आहे. 


 सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रशालेतील सर्व तज्ञ व अनुभवी विषय शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांचे स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम ,शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत किरण गित्ते  (सचिव,त्रिपुरा सरकार) व शाळेचे प्राचार्य श्रीकांत पाटील सर यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....