भावपूर्ण श्रद्धांजली....!

 सौ. शोभाबाई विजयकुमार मराठे यांचे निधन










परळी (प्रतिनिधी) –

परळी शहरातील विधीतज्ज्ञ ॲड. प्रकाश मराठे यांचे मोठे बंधू विजयकुमार मराठे यांच्या पत्नी व सचिन मराठे यांच्या मातोश्री सौ. शोभाबाई विजयकुमार मराठे (वय ८०) यांचे बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कै. शोभाबाई या अत्यंत मनमिळाऊ, धार्मिक वृत्तीच्या आणि सर्वांना आपलेपणाने जपणाऱ्या महिला होत्या. आयुष्यभर कुटुंबातील सर्व सदस्यांना आधार देत त्यांनी आपल्या सुस्वभावी वर्तणुकीने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर तसेच नातेवाईक, परिचित व समाजमंडळींवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पार्थिवावर परळी येथील स्मशानभूमीत आज गुरुवार दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी, समाजबांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहिली.कै. शोभाबाई यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, दीर, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !