इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

साधु-संत येती घरा......तोचि दिवाळी दसरा !!!!

गोदावरी परिक्रमा यात्रा : मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह शेकडो साधु संतांचे बुधवारी परळीत आगमन 


परळी वैद्यनाथ दि.१५(प्रतिनिधी)

     गोदावरी परिक्रमा यात्रेनिमित्त बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री  मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह शेकडो साधु संतांचे बुधवारी परळीत आगमन होत आहे.येणार्या साधु संताचे स्वागत व मोटारसायकल रॅलीत परळी पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक,ईटके काॅर्नर परळी वैद्यनाथ या ठिकानाहुन पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह ३५० साधु संतांचे परळीकरांच्या वतीने स्वागत करून मोटारसायकल शोभा रॅलीस प्रारंभ होईल.ही रॅली शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल ,एकमिणार चौक,स्टेशन रोड,राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक,ते प्रभु वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे.या रॅली मार्गावर ठिक ठिकाणी पुष्पवृष्ठी करण्यात येणार आहे. नंतर प्रवचन मंडप वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह सर्व साधुंचे स्वागत व पुजन होणारआहे.त्यानंतर येणार्या सर्व भावीकांना महाराजांचे दर्शन घेता येणार आहे.या सर्व धार्मिक कार्यक्रमास परळी वैद्यनाथ पंचक्रोशीतील भावीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या