युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कॅबिनेटची मंजूरी अन् तरतूद

ना.पंकजा मुंडे यांचे परळीला नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट ; पशुवैद्यकीय महाविद्यालयास मिळाली कॅबिनेटची मंजूरी

५६४ कोटी ५८ लाख रूपयांच्या तरतूदीस राज्य सरकारची मान्यता


मुंबई।दिनांक २५।

राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदारसंघाला महाशिवरात्री व नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट दिलं आहे. परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिला असून यासाठी ५६४ कोटी ५८ लाख रूपयांच्या तरतूदीस  मंजूरी दिली आहे.


  ना. पंकजाताई मुंडे पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी  जिल्ह्यात परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आपल्या विकासाभिमुख कामाची चुणूक दाखवून दिली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या टीमने ९ फेब्रुवारी रोजी परळी शहरातील मेरू पर्वतावर आणि लोणी येथे यासाठी जागेची पाहणी केली होती व तसा अहवाल शासनाकडे सादर केला होता. महाविद्यालय स्थापन होण्याकरिता लागणाऱ्या मुलभूत सोयी सुविधा, पाण्याची उपलब्धता तसेच इतर आवश्यक बाबी या दोन्ही ठिकाणी सहजपणे उपलब्ध असल्याने महाविद्यालय स्थापन करण्याकरिता कसलीही अडचण येणार नाही असे संबधित अधिकाऱ्यांनी शासनाला कळवले होते.


कॅबिनेटची मंजूरी अन् तरतूद

-------

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उप मुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली, त्यासाठी ५६४ कोटी ५८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या