भावपूर्ण श्रद्धांजली....!
टेलर सुभाष महाजन यांना पत्नीशोक; सौ.रजनीताई महाजन यांचे निधन
परळी (प्रतिनिधी)
परळी शहरातील दिगंबर जैन मंदिरचे पुजारी सुभाष महाजन यांच्या पत्नी सौ.रजनीताई महाजन यांचे सोमवार दि.२८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ७२ वर्षांचे होते.
परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात असलेल्या महाजन टेलर्सचे मालक व दिगंबर जैन मंदिरचे पुजार्याची परंपरा असलेल्या सुभाष महाजन यांच्या पत्नी सौ.रजनीताई जैन धार्मिक कार्यात सतत सहभागी असायच्या त्यांच्या या स्वभावामुळे रजनीमावशी ओळखल्या जात.मागील काही दिवसांपासुन वर्धाक्याने त्या आजारी होत्या यातच सोमवार दि.२८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चातचार मुली १ मुलगा,सुन नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर परळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचा राख सावडण्याचा विधी बुधवार दि.३० जुलै रोजी होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा