प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

श्रावणी वेदप्रचार सप्ताह.....

रविवारपासून परळीत भव्य श्रावणी वेदप्रचार सप्ताहातून अध्यात्मज्ञानाची मेजवानी 

प्रकांड विद्वान पं.चंद्रदेवजी यांची मौलिक प्रवचने व पं.राजेश आर्य यांची सुश्राव्य भजने सादर होणार  

परळी वैजनाथ दि.३०-

        श्रावण महिन्यात पवित्र शास्त्रश्रवणाचे औचित्य साधून विशुद्ध वैदिक ज्ञानाच्या माध्यमाने मानवी जीवनाला धार्मिक ,आध्यात्मिक, बौद्धिक व सामाजिक कल्याणाची सुयोग्य दिशा प्राप्त व्हावी,  या उद्देशाने येथील आर्य समाजाच्या वतीने येत्या रविवार दि.३ ऑगस्ट पासून श्रावणी वेदज्ञानकथा प्रचार सप्ताहाला सुरुवात होत आहे. यासाठी मार्गदर्शक व्याख्याते म्हणून फरुखाबाद (उ. प्र.) येथील वैदिक शास्त्रांचे प्रकांड विद्वान आचार्य पं. श्री चंद्रदेवजी शास्त्री तर भजनगायक म्हणून मैनपुरी (उ.प्र.) येथून प्रसिद्ध संगीतकार पं. राजेशजी आर्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे. येथे आठवडाभर दररोज सकाळी वेद पारायणयज्ञात श्रद्धाळू यजमान भक्ती भावनेने आहुत्या प्रदान करणार आहेत. वरील प्रकांड विद्वानांची अभ्यासपूर्ण व्याख्याने प्रवचने व मधुर सुश्राव्य भजन संगीताची मेजवानी श्रोत्यांना लाभणार आहे. कार्यक्रमाची सांगता शनिवारी ९ ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रमांनी होईल.

             महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेतर्फे परळी आर्य समाजासाठी हा कार्यक्रम देण्यात आला आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियोजन बैठक संपन्न झाली. त्यात सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार वेद प्रचार सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ७.३० वा. वेद पारायण यज्ञ, ८.३० वा. भजनसंगीत, ९.३० वा. धार्मिक व आध्यात्मिक विषयावर प्रवचने पार पडतील. त्यानंतर ११.०० वा. विविध शाळां- महाविद्यालयांत व्याख्याने असे विविध कार्यक्रम संपन्न होतील. तर रात्री ८.०० वा. भजन संगीत व ९.०० वाजता पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय व अन्य प्रासंगिक विषयावर मौलिक व्याख्याने पार पडतील. 

           तरी या कार्यक्रमांचा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया, मंत्री उग्रसेन राठौर , कोषाध्यक्ष श्री देविदासराव कावरे , उपप्रधान लक्ष्मण आर्य गुरुजी, डॉ मधुसूदन काळे, उपमंत्री पं. प्रशांतकुमार शास्त्री, जयपाल लाहोटी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या