प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा आढावा बैठक उत्साहात 

विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 

परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)

      महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी (दि.२४) सकाळी ९ वाजता करण्यात आले होते . या बैठकीस शहरासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती होती. या बैठकीत संघटनेच्या विविध तालुक्यातील नियुक्त्या करण्यात आला.

         महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने येथील श्री.शनी मंदिराच्या सभागृहात गुरुवारी जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीस महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ भूषण कर्डिले, (नाशिक), राज्य कोषाध्यक्ष गजानन शेलार, युवक प्रदेशाध्यक्ष अतुल बांदिले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उपाध्यक्ष संजय विभुते, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे सहसचिव सुनील चौधरी, प्रदेश सहसचिव जयेश बागडे, राज्य उपाध्यक्ष निलेश सकपाळ, नांदेड विभागाध्यक्ष मधुकर राऊत, विभागीय सचिव पांडुरंग शिंदे, युवा आघाडी विभागीय अध्यक्ष संजय कळणे, विभागीय कार्याध्यक्ष प्रा काशीनाथ सालमोटे, नागपूर विभागाध्यक्ष जगदीश वैद्य, वर्धा युवा अध्यक्ष सुनील मांगरुडकर, विठ्ठल आप्पा चौधरी, परभणी जिल्हा अध्यक्ष सतिश नगराळे, परभणी सहसचिव रमेश चांदिवाले,श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवा लांडगे, व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर, कोलूघाणा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश लांडगे, उपाध्यक्ष सुर्यकांत व्यवहारे,छगन आप्पा क्षीरसागर यांच्या सह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गजानन शेलार यांनी समाजाची ताकत ही संघटनेत असते त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी संघटना बांधणीचे कार्य हिरीरीने केले पाहिजे. संघटना बांधली असेल तर शासन आपल्या मागण्या पूर्ण करते. तर संजय विभुते यांनी सांगितले की,परळीतील समाजाने एकत्र येवून जिल्हा संघटित केला पाहिजे. जिल्हा संघटित झाल्याशिवाय समाजाची ताकत दिसणार नाही. तर युवा प्रदेशाध्यक्ष अतुल बांदिले यांनी युवकांनी एकत्र येत संघटन मजबूत केले पाहिजे, युवक संघटित झाल्याशिवाय समाजाची ताकत दिसणार नाही. संघटित झाल्याशिवाय आपल्याला सामाजिक, आर्थिक व राजकीय फायदा होणार नाही. म्हणून युवकांनी एकत्र यावे. सुनील चौधरी यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या मागणीला यश आले असून देशात जातीय जनगणना होणार आहे. तेली समाजाच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करून तेली समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या कार्यक्रमात परळीसह सिरसाळा, माजलगाव मधील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रविण फुटके, आभार प्रा मधुकर शिंदे यांनी मानले. 

 या बैठकीस जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर फुटके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राधाताई फकिरे, युवक जिल्हाध्यक्ष संतोष वाघमारे, जिल्हा सचिव प्रा.मधुकर शिंदे, युवक आघाडीचे संभाजीनगर कार्याध्यक्ष अतुल बेंडे, सेवा आघाडी संघटक नितीन चौधरी, सेवा आघाडी कार्याध्यक्ष प्रा गणेश परळीकर सह तालुकाध्यक्ष मोहन राजमाने, शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत व  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या