परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
जनसेवेसाठी सदैव उपलब्ध असणारा...
सर्वसामान्यांचा हक्काचा आणि कामाचा माणूस :राजेशभाऊ गित्ते
लोकनेत्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा.ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि मा खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांचे एकनिष्ठ आणि विश्वासू परळी वैजनाथ भाजपा तालुका अध्यक्ष तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथगड पांगरी संचालक राजेश गित्ते यांचा आज वाढदिवस....
राजेश गित्ते यांचे वाढदिवसा निम्मित अभिष्टचिंतन करत असताना राजेश गित्ते यांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना सदैव एकनिष्टेला आणि समाजसेवेला प्राधान्य दिले आहे.
लोकनेत्या मा ना पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सदैव सर्वसामान्य जनतेची कामे कशी मा. पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मार्गी लागतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून जनतेचे जीवाहळ्याचे प्रश्न मार्गी लावले.
सत्ता असो किंवा नसो सदैव मा. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मा खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, कष्टकरी, दिन, दुबळे, सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत सदैव धावून जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राजेश गित्ते सदैव उपलब्ध असतात.
शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न असो, विमा रखमेतून बँकेचे थकीत कर्ज वसुली असेल,सर्व सामान्य जनतेचे तहसील, पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाना इत्यादी ठिकाणी येणाऱ्या अडचणी मा ना पंकजा ताई मुंडे यांच्या माध्यमातून राजेश गित्ते सोडवण्यासाठी तत्पर असतात.
सत्ता असो किंवा नसो राजेश गित्ते यांनी सदैव मा. पंकजाताई मुंडे यांची साथ दिली. बरेच लोक सत्ता नसताना साथ सोडून गेले पण राजेश गित्ते ताई साहेब यांचा आदेश अंतिम प्रत्येक आदेशाचे पालन करून दिलेली जिम्मेदारी यशस्वी पणे पार पाडली.
लोकनेता संपर्क कार्यालयच्या माध्यमातून तालुक्यातील येणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे काम राजेश गित्ते प्रामाणिक पणे करीत आहेत. थोर पुरुषांची जयंती, विविध क्षेत्रातील लोकांचे वाढदिवस, विविध स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या विध्यार्थी यांचे कौतुक लोकनेता संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात येते. राजेश गित्ते यांचे लोकनेता संपर्क कार्यालय सर्व समावेशक म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे.
असे म्हणतात की *हिरे का मोल असली जोहरी ही जानता है* मा ना पंकजाताई मुंडे यांनी राजेश गित्ते यांची एकनिष्ठा आणि विश्वासार्था आणि सर्व सामान्य जनतेसाठी असलेली तळमळ पाहून राजेश गित्ते यांची बीड जिल्हा परिषद स्वीकरत सदस्य म्हणून निवड केली, तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपनथगड पांगरी संचालक म्हणून निवड केली आणि आता भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदाची मोठी जवाबदारी दिली आहे.
विविध पदावर काम करत असताना आपल्या हातून समाजसेवा करून मा ना पंकजाताई मुंडे यांचा समाजसेवेचा वसा प्रामाणिक पणे राजेश गित्ते राबवत आहेत.
भविष्यात ही राजेश गित्ते यांच्या हातून अशीच समाजसेवा घडावी ही प्रभु वैद्यनाथ चरणी प्रार्थना.
*पुनःसच राजेश गिते यांना वाढदिवसाच्या मन पूर्वक शुभेच्छा*..!!
✍️केशव गित्ते
अध्यक्ष :राजेश भाऊ गित्ते मित्र मंडळ तालुका परळी वैजनाथ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा