इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे व टीम सन्मानित....!

 अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाच्या जलद तपासाबद्दल संभाजीनगर पोलिसांचा गौरव


 

परळी (प्रतिनिधी)

 परळी रेल्वे स्थानकात दि.३१ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथून रेल्वेने आलेल्या व रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका मजूर कुटुंबातील चिमुकलीवर घडलेल्या अत्याचार घटनेचा अवघ्या पाच तासात तपास लावुन आरोपी अटक केल्याच्या कामगिरीबद्दल संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पो.नि.धनंजय ढोणे व कर्मचार्यांचा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

 परळी रेल्वे स्थानकात दि.३१ ऑगस्ट रोजी दुपारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीची ओळख,त्याला ताब्यात घेणे,गुन्हा दाखल करणे असा तपास करण्याचे संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पो.नि.धनंजय ढोणे यांच्यापुढे आव्हान होते.ढोणे यांनी यासाठी सीसीटीव्हीची मदत घेत आरोपीचे फुटेज मिळवून ओळख पटवली.त्याला ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळी पथके नेमुन ताब्यात घेत गुन्हा दाखल केला व अवघ्या पाच तसात या घटनेचा तपास लावला.संभाजीनगर पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. यावेळी पो.नि.धनंजय ढोणे, पो.उपनिरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक.पो.नि नरहरी नागरगोजे, पो.अंमलदार भगवान चव्हाण यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या