युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...

 परळी लोकन्यायालयात 66 प्रकरणे तडजोडीने निकाली





परळी वैजनाथ 

परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. 


दिनांक 13  सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व 25 व दाखल प्रकरणे मिटले 41 मिळून 66 प्रकरणे निकाली निघाली आणि एकूण रक्कम वसुली 97 लाख 50 हजार 104  रुपयांची बँक पतसंस्था यांची वसुली झाली आहे .सदर लोकन्यायालयात पंच परळी न्यायालयाचे न्या डि आर बोर्डे न्या डि वाय रायरीकर ॲड मोहन कराड ॲड बुद्धरत्न उजगरे यांनी काम पाहिले. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी  ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड दस्तगीर सचिव ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड

नागापूरकर ॲड जीवनराव देशमुख ॲड अनिल मुंडे ॲड गजानन पारेकर ॲड लक्ष्मीकांत मुंडे ॲड डि.पी.कडबाने ॲड विलास बडे ॲड लक्षमण अघाव ॲड उषा दौंड  ॲड कल्याण सटाले ॲड मार्तँड शिंदे ॲड लक्षमण गित्ते ॲड जगन्नाथ आंधळे  ॲड ज्ञानोबा मुंडे ॲड सुनिल सोनपीर ॲड दिनकर वाघमोडे  ॲड दत्ता कराड ॲड आबा सोळंके ॲड केशव अघाव  ॲड अर्जुन सोळंके ॲड शाकेर सय्यद ॲड सुल्तान सहाय्यक अधीक्षक गिरीधर जोशी हाश्मी गणेश कलशेटे बडगिरे लघुलेखक सचिन गुप्ता सुंदर मुंडे अमित गजबार कृष्णा कळसदकर सचिन कळसकर जयराम गंगणे अविनाश चौधरी शेख अर्शद सह वैद्यनाथ बँकेचे वसुली अधिकारी राहुल गोपणपाळे व इतर बँकाचे अधिकारी तथा परळी पोलीस वाहतूक शाखेचे अधिकारी तथा कर्मचारी ईत्यादी यांनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या