परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत होणार साजरा
वाढदिवसानिमित्त विविध सामाजोपयोगी उपक्रम राबविणार- केशव गित्ते
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
लोकनेत्या पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि मा खा डॉ प्रितमताई मुंडे यांचे एकनिष्ठ आणि विश्वासू भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांचा ‘वाढदिवस’ सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवार दि.११ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती राजेश भाऊ गित्ते मित्र मंडळाचे केशव गित्ते यांनी दिली आहे.
लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी घालून दिलेल्या आदर्श संकल्पनेनुसार समाज सेवेचा वसा जोपासत समाज उपयोगी कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय राजेश गित्ते मित्र मंडळाने घेतला आहे.
वाढदिवसा निम्मित गुरुवार दिनांक 11/09/2025 रोजी सकाळी प्रभू वैधनाथ अभिषेक, निराधार व्यक्तींना अन्नदान, पर्यावरण संतुलणासाठी वरक्षारोपण, केंद्रीय प्राथमिक विद्यालय बेलंबा येथे विध्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.वरील सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेश भाऊ गित्ते मित्र मंडळाचे अध्यक्ष केशव गित्ते यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा