प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महापशुधन एक्स्पो2026: आज  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहा -राजेश गित्ते 





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  लोकनेत्या  ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र ) यांच्या संकल्पनेतून परळी वैजनाथ येथे  महा पशुधन एक्सपो -2026(13-15फेब्रुवारी)आज दिनांक 14/02/2026रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणवीस भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत

या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, सरपंच, चेअरमन, नागरिक, युवक, युवती यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळीभाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांनी केले आहे.

             महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय ऐतिहासिक ‘महापशुधन एक्सपो’चे उद्घाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज वैद्यनाथ महाविद्यालया समोरील ओपळे मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावली आहे.  महाशिवरात्र आणि महा पशुधन एक्सपो हा अत्यंत सुंदर योगायोग आहे.  पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गित्ते यांनी केले आहे. 

           महा पशुधन एक्स्पो2026, आज मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजेश गित्ते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या