इमेज
  जातीवाचक उल्लेख करून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई घोलपवाडी ता.अंबाजोगाई येथे एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या घरी असताना आरोपी कैलास तुळशीराम पुरणे (रा. घोलपवाडी, ता. अंबाजोगाई) याने तिचा हात धरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. उपस्थित नागरिकांना पाहून आरोपीने पीडितेच्या जातीचा उल्लेख करत शिवीगाळ केली. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित तरुणीने बर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसे...

 महाशिवरात्री निमित्त नगर परिषदेच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडी, शेंगदाणा लाडू व पाणी बॉटलचे वितरण



परळी वैजनाथ, प्रतिनिधी... 

      बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री महापर्वा निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडी, शेंगदाणा लाडू व शुद्ध पाणी बॉटलचे वितरण करण्यात आले. 

      बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैजनाथच्या महाशिवरात्री दर्शन पर्व काळासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त परळी शहरात दाखल होत असतात. या अनुषंगाने महाशिवरात्री महापर्वणी काळात नगर परिषदेच्या वतीने विविध सेवा, सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.त्या अनुषंगाने परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या वतीने प्रभू वैद्यनाथाच्या  दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाशिवरात्री निमित्त फराळ अन्नपदार्थांची व्यवस्था दरवर्षी करण्यात येते. यावर्षीही भावीकभक्तांसाठी साबुदाणा खिचडी, शेंगदाणा लाडू व शुद्ध पाणी बॉटल ची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांनी या स्टॉलला भेट दिली.नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, परळी नगर परिषदेचे सर्व सदस्य, सदस्या, अधिकारी, कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या