इमेज
  जातीवाचक उल्लेख करून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई घोलपवाडी ता.अंबाजोगाई येथे एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या घरी असताना आरोपी कैलास तुळशीराम पुरणे (रा. घोलपवाडी, ता. अंबाजोगाई) याने तिचा हात धरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. उपस्थित नागरिकांना पाहून आरोपीने पीडितेच्या जातीचा उल्लेख करत शिवीगाळ केली. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित तरुणीने बर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसे...

रुद्राभिषेक का केला जातो?...

महाशिवरात्र पर्व: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सपत्नीक केली  प्रभु वैद्यनाथाची विधिवत महापूजा




परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.,..

      बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री l निमित्त वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने तीन दिवशीय शिवरात्र महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात  महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी प्रभू वैद्यनाथाची जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रुद्राभिषेक व अलंकार पूजा केली जाते. या अनुषंगाने आज सायंकाळी बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी परंपरेप्रमाणे सपत्नीक विधीवत प्रभू वैद्यनाथाची  पूजा केली.

     पंचम ज्योतिर्लिंग प्रभू व जनता ची महाशिवरात्रीची महापूजा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आली. परंपरेप्रमाणे प्रभू वैद्यनाथ मंदिरात संपूर्ण विधी व ब्रह्मवृंदांच्या वैदिक मंत्र उच्चारात ही पूजा करण्यात आली. प्रभू वैद्यनाथाला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त मंडळ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रुद्राभिषेक का केला जातो?

  ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रुपात शिवलिंगात प्रगट झाले आहेत. ज्योतिर्लिंग याचा अर्थ आत्मज्योत असा आहे. ही उपासनेसाठी आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजे लिंगावर रुद्राभिषेक करणे.भगवान शंकराला अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेकाने तो लवकर प्रसन्न होतो. म्हणून जेथे जेथे शंकराची पिंडी असेल तेथे पाण्याची संतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते. शिवलिंगाच्या अभिषेकाचे पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे असते. कारण ते उत्तरेकडे असणाऱ्या गंगानदीकडे जाते, ही भावना असते. परळी वैजनाथ येथे वैजनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील सभागृहात मंडल पूजा मांडली जाते. आकर्षक पद्धतीने व वैदिक विधीनुसार वेदोक्त व शास्त्रोक्त मंत्रोच्चारात ही पूजा केली जाते त्यानंतर रुद्राभिषेक होतो. महाशिवरात्रीच्या पर्वकाळात सायंकाळी रुद्राभिषेक व अलंकार पूजेला आनंद साधारण महत्त्व असल्याचे मानले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या